खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा :

हरियाणाला चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे यजमानपद

केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री किरेन रीजीजू आणि हरियाणाचे मुख्य मंत्री मनोहर लालखट्टर यांनी 25 जुलै 2020 रोजी चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हरियाणा भूषवणार असल्याची घोषणा केली. टोकियो ऑलिम्पिक नंतर या स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे.
 हरियाणातल्या पंचकुला इथे या स्पर्धा होणार आहेत.

यापूर्वीच्या तीन खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत हरीयानाने सातत्याने उत्तम कामगिरी केली आहे. 2019 आणि 2020च्या या स्पर्धात राज्याने दुसरे स्थान 
तर 2018 मध्ये 102 पदके पदकांच्या कमी कमाई सह सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा

क्र. . वर्ष ठिकाण 

1 2018 दिल्ली 

2 2019 पुणे (महाराष्ट्र)

3 2020 गुवाहाटी (आसाम)

4 2021 पंचकुला (हरियाणा)

जगातील सर्वात मोठा मांजरवर्गीय प्राणी म्हणजे वाघ. त्याच्या गौरवार्थ २९ जुलै हा दिवस जागतिक वाघ दिन म्हणून साजरा केला जातो. रशियातील सेंट पिटर्सबर्ग वाघ परिषदेत २९ जुलै २०१० साली जागतिक वाघ दिन म्हणून घोषित केला गेला.

राफेल विमानं आज भारतात Land होणार, अंबाला Air Force Station परिसरात कलम 144 लागू

 • France हुन सुमारे 7000 किमी प्रवास करुन रवाना झालेले 5 राफेल लढाऊ विमान आज (29 जुलै) दुपारी 1 ते 3 वाजेच्या दरम्यान भारतात अंबालाच्या Air Force Station इथे पोहोचतील. भारतात येताना विमानं 30 हजार फूट उंचीवर असताना त्यात इंधन भरण्यात आलं.
 •  भारत सरकारने हवाई दलासाठी 36 राफेल विमानांची खरेदी करण्यासाठी 4 वर्षांपूर्वी फ्रान्ससोबत 59 हजार कोटी रुपयांचा करार केला होता.
 • गर्दी होण्याच्या शक्यतेमुळे अंबाला एअरफोर्स परिसरात कलम 144 लागू केला आहे. Photography व Videography  वर बंदी घालण्यात आली आहे.
 •  अंबालाचं महत्त्व काय ?
 • अंबाला हे सामरिक महत्त्वाचं मिलिट्री बेस आहे. इथे ब्रह्मोस क्षेपणास्त्र, हवाई दलाचं मिग-21 ‘बायसन’ आणि जॅग्वार लढाऊ विमांनाचे स्क्वॉड्रनही इथे तैनात आहेत.
 • भारतीय सैन्याचा खड़्ग स्ट्राईक कोरचं (2 कोर) मुख्यालयही अंबाला एअरबेसच्या अतिशय जवळच आहे. त्यामुळे हे संवेदनशील क्षेत्र असून शत्रूचं त्यावर नजर असते.
 •  राफेल लढाऊ विमानाची वैशिष्ट्ये-
 1.  राफेल विमानाचा वेग 2,223 किमी प्रति तास आहे हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं, इंधन  क्षमता   17 हजार किलो आहे.
 2. हरतऱ्हेच्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम, त्यामुळे ते मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं   जातं.
 3. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे
 4.  राफेलची मारक क्षमता 3700 किमीपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किमी आहे.
 5.  हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल ॲटॅकमध्येही अव्वल आहे.
 6. राफेल विमान 24,500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं.

Leave a Reply

Your email address will not be published.