Maharashtra TET Exam 2021 Date 31 October 2021

Last Updated on 3 weeks by rajaswacareeracademy

TET ची परीक्षा 31 October रोजी होणार आहे.

TET Exam 2021 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत येत्या 10 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) पुढे ढकलण्यात आली आहे. TET परीक्षेचे सुधारित वेळापत्रक (TET Exam Timetable) परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षा असल्यानं TET ची परीक्षा 31 October रोजी होणार आहे. टीईटीसाठी राज्यात 3,30,642 उमेदवारांनी नोंदणी (Registration) केली आहे.

  • TET EXAM TIME TABLE :
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I: 31/10/2021 रोजी स. 10:30 ते दु 1:00 पर्यंत
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II: 31/10/2021 रोजी दु. 2:00 ते सायं. 4:30 पर्यंत

  • प्रवेशपत्र (Admit Card)
  • प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : 14 ऑक्टोबर 2021 ते 31 ऑक्टोबर 2021
  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर https://mahatet.in/ प्रवेशपत्र उपलब्ध होईल.
  • TET SYLLABUS :
  • पेपर 1: बालविकास आणि पेडॉगॉजी, मराठी आणि इंग्रजी भाषा , गणित
  • पेपर 2: बालविकास आणि पेडॉगॉजी, इंग्रजी आणि मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्रे या विषयांवर आधारीत प्रश्न पेपर क्रमांक 2 मध्ये विचारले जातात.टीईटी परीक्षेमध्ये 60 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केलं जातं, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी गुणांची मर्यादा 55 टक्के निश्चित करण्यात आली आहे. टीईटी परीक्षा ही 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेच्या शिक्षकांसाठी घेण्यात येते. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरावर अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांना ही परीक्षा अनिवार्य असते.
👉🏻 महाराष्ट्र TET परीक्षा साठी अत्यंत उपयोगी पुस्तके